डेरवण येथील युथ गेम मध्ये माखजन हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची चमक

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल माखजन च्या विद्यार्थ्यांनी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या युथ गेम २०२४ मध्ये विविध खेळात मोहोर उमटवली आहे.

ही स्पर्धा डेरवण येथील.एस.व्ही.जे.सी.टी स्पोर्ट्स अकादमी तर्फे आयोजित करण्यात आली होती.डेरवण युथ गेम्स चे हे १० वे वर्ष आहे.या स्पर्धामध्ये लंगडी या प्रकारात १२ वर्षाखालील मुलांनी प्रथम क्रमांक पटकवला.त्यांना रोख १० हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.तर याच खेळात १५ वर्षाखालील मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला.त्यांना ८ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.१५ वर्षाखालील मुलींनी द्वितीय क्रमांक मिळाला. त्यांना ८ हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.१५ वर्षाखालील मुलांच्या गटात दर्पण दिलीप कातकर हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
यशस्वी विद्यार्थ्यांना निखिल वारके, अभिजित सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आनंद साठे,उपाध्यक्ष मनोज शिंदे,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.