शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या १०८ पिल्लांना दिले जीवदान

 

वेंगुर्ले l दाजी नाईक :शिरोडा वेळागर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गुणाजी उर्फ आजु अमरे व कासव मित्र सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांनी पर्यटकांच्या उपस्थितीत शिरोडा वेळागर येथे समुद्रात ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या १०८ पिल्लांना सोडून जीवदान दिले.

किनाऱ्यावर या दोघांनी अंड्यांना सुरक्षित ठिकाणी वाळुच्या खड्यात पुरुन त्यांचे संरक्षण केले. व गेले अनेक वर्षे हे कार्य ते करित आहेt. पंचेचाळीस दिवसांपुर्वी आजु अमरे यांनी सुरक्षित केलेल्या १२० अंड्यांमधून १०८ पिल्ले बाहेर आली त्यांना सुरक्षित पाण्यात सोडण्यात आली. यावेळी आजु अमरे, आबा चिपकर, गौरीज अमरे , मदन अमरे, पास्कोल फर्नांडिस , आनंद अमरे, दीपा अमरे, संतोष भगत, भुषण मांजरेकर,आकाश रेडकर,कोमल भगत, शोजल भगत, प्रज्वल भगत, छकुली भगत, स्वपनेश भगत, सलोनी भगत, साची भगत व विदेशी पर्यटक उपस्थित होते. छोट्या छोट्या पिल्लांना समुद्रात जातानाचा छान अनुभव पर्यटकांनी घेऊन आनंद लुटला.