खेड(प्रतिनिधी)शहरातील एआयसीपीई योग केंद्राच्या वतीने महिलांच्या मोठ्यागटातील योगा स्पर्धेत सरस्वती नंदवंशी तर लहानगटात सायली खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
चिखले सभागृहात घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक योग विद्याधामचे प्राध्यापक व महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष विश्वास शिर्के, एआयसीपीइ योग केंद्राचे संचालक विश्वेश चिखले, महाराष्ट्र कुस्तीपटू व कबड्डी राष्ट्रीय पंच प्रशिक्षक विद्याधर चिखले आदी उपस्थित होते.
मोठ्यागटात नेत्रा कवळे यांनी द्वितीय तर रोशनी तलाठी, कोमल तटकरी, वनश्री जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. लहानगटात आर्या पेठे हिने द्वितीय क्रमांक तर सिद्धी घाडगे, जुई धामणकर, मधुरा तटकरी यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून अक्षता अशोक साळवी, एकता सकपाळ, प्रियांका जाधव, सुनीता जोशी, डॉ. मधुरा बाळ यांनी काम पाहिले. विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.









