भरणे च्या श्री देवी काळकाई देवीला शासकीय सलामी 

 

दसऱ्यापाठोपाठ शिमगोत्सवातही मान; शिवसेना नेते रामदास कदम यांचा पाठपुरावा, भाविकांच्या उत्साहाला उधाण

खेड(प्रतिनिधी)तमाम भक्तांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारी य माहेरवाशिणीची पाठराखीण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील आदिमाया श्री काळकाई देवीला जिल्हा पोलीस दलाने दसऱ्यापाठोपाठ शिमगोत्सवातही शासकीय सलामी देण्यात आली

 

सोमवारी मानवंदनेचा सोहळा पाहण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची अलोट गर्दी उसळली होती. या शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. होता

 

भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री देवी काळकाईला शासकीय सलामी मिळावी, यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने यापूर्वी तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला होता. मात्र प्रस्तावाची फारशी दखल घेण्यात

आली नव्हती. माजी पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी या बाबत मुख्यमंत्री सचिवालयात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले होते. त्यानुसार गतवर्षी २४ ऑक्टोबर रोजी प्रथमच भरणे येथील श्री काळकाई देवीला दसन्याच्या दिवशी जिल्हा पोलीस पथकाकडून शासकीय सलामीचा मान मिळाला होता. या सलामीने सभोवतालचा परिसरही भक्तीमय झाला होता. दसऱ्यापाठोपाठ शिमगोत्सवातही पोलीस दलाकडून शासकीय सलामीचा बहुमान प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाकडून श्री देवी काळकाईला शासकीय मानवंदना देण्यात आली.

 

 

श्री देवी काळकाईला शासकीय सलामी देणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री काळकाई देवी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे, उपाध्यक्ष सुरेश भुबड, राजेंद्र शिर्के, सचिव प्रशांत चव्हाण, सहसचिव संदीप खेराडे, खजिनदार सतीश पाटणे, सहखजिनदार विजय फागे, गणपत घोले, सदस्य मधुकर शिंदे, सुरेश धुमाळ, प्रदीप भुवड, अंकुश भुवड, दीपक बैकर, चिराग पडशी, पुजारी अनंत जंगम, विजय जंगम यांच्यासह भाविक उपस्थित होते.