खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील चाकाळे कोळकेवाडी (पुनर्वसाहत) येथील ग्रामस्थांचे मौजे कोळकेवाडी (आलोरे) ता. चिपळुण येथुन महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या कोयना जल विद्युत प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यामध्ये ग्रामस्थांचे पुनर्वसन सन १९७४ रोजी झाले आहे. सदरच्या पुनर्वसनाला सन २०२४ रोजी ५० वर्षे पुर्ण होत आहेत. या सुवर्ण मोहत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा हा एक उपक्रम राबविला जाणार आहे हि स्पर्धा दोन गटात आहे छोटा गट इ. ८ वी ते १० वी साठी एक गट, तसेच इ. ११ वी ते पुढील पदवी पर्यतचा खुला गट अशा दोन गटात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून. स्पर्धेसाठी दोन्ही गटातुन जास्तीत जास्त १०० – १०० विद्यार्थ्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
तसेच या स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क असणार आहे
स्पर्धा साठी छोटा गट करिता आपले संविधान,
प्लास्टिक मुक्त भारत, मराठी भाषेचे महत्व , आदर्श नागरीक
खुला गटा साठी – आपले संविधान , पर्यावरण संवर्धन काळाची गरज, विज्ञान आणि शेतकरी, उद्योजकता विकास ही काळाची गरज हे विषय आहेत
स्पर्धेचे स्वरुप व बक्षिस छोट्या गटा साठी
प्रथम क्रमांक :- २हजार ५०० रोख व सन्मान चिन्ह व्दितीय क्रमांक :- १ हजार ५०० रोख व सन्मान चिन्ह , तृतीय क्रमांक :- १हजार रोख व सन्मान चिन्ह
खुला गटा साठी प्रथम क्रमांक :- ३ हजार रोख व सन्मान चिन्ह व्दितीय क्रमांक :- २ हजार- रोख व सन्मान चिन्ह , तृतीय क्रमांक :- १ हजार ५०० रोख व सन्मान चिन्ह अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत
ही स्पर्धा ३१ मार्च रोजी स. १०.३० एल. पी. इंग्लिश स्कुल, खेड एस. टी. स्टॅड समोर, खेड येथे पार पडणार आहे स्पर्धेसाठी संपर्क गौरव मोहिते – ९७५७१६३९८, दिपक पांडुरंग मोहिते :- ९४२०००३४६२ , अजित कृष्णा मोहिते ९८६९३९७३९१ यांच्या शी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे











