दापोली l प्रतिनिधी :डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मध्ये जिल्हा परिषद, कृषि विभाग, पंचायत समिती, दापोली आणि विस्तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालय, दापोली यांचे संयुक्त विद्यमाने हळद लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी कृषि महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, पंचायत समिती, दापोलीचे गट विकास अधिकारी श्री. गणेश मंडलिक, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जगदीश कदम, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल माळी, सहाय्यक गट विकास, अधिकारी श्री. सुनील खरात, कृषि अधिकारी सौ. जयश्री रेवाळे आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी हळद लागवडी विषयी सखोल ज्ञान अवगत करून कोकणातील हळद लागवडीखालील क्षेत्र वाढवून आपल्या उत्पन्नात वाढ करावी असे शेतकऱ्यांना आवाहन केले.
गट विकास अधिकारी श्री. गणेश मंडलिक यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित शेतकऱ्यांना सदर प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. सुनील खरात यांनी विविध शेतीविषयक योजनांची माहिती देऊन त्या योजनेनुसार सबसिडी कशी मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तांत्रिक सत्रामध्ये अखिल भारतीय मसाला पिके योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल माळी यांनी हळद लागवड व उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयी सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे शंका निरसन केले. डॉ. आशिष भुवड यांनी हळद लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. जयश्री रेवाळे आणि सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. प्रवीण झगडे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी कृषी कु. रोशनी जाधव, कृषि अधिकारी सौ. जयश्री रेवाळे, विस्तार अधिकारी कृषि श्री भरत भुसारे व विस्तार अधिकारी कृषी कु.तेजश्री कांबळे आणि विस्तार शिक्षण विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, कृषी सहाय्यक समीर उसरे, दृक श्राव्य चालक श्रीयश पवार, शिपाई चंद्रकांत साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर व कणकवली तालुक्यातील एकूण 65 शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.











