शशिकांत पवार यांचा प्रामाणिकपणा

 

पैशाचे हरवलेले पाकीट महिलेला दिले

आबलोली (वार्ताहर)गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील प्रसिद्ध टेलर आणि व्यापारी संघटना आबलोलीचे सल्लागार श्री.शशिकांत पवार यांना ऐन शिमगोत्सवाच्या सणात आबलोली मधील गजबजलेल्या बाजारपेठेतील त्यांच्या दुकाना समोर पैशाचे लेडीज पाकीट मिळाले.

शशिकांत पवार यांनी हे पाकीट मिळाल्याची वार्ता त्यांनी आबलोली व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कानावर घातली.यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.ऋषीकेश बाईत , उपाध्यक्ष विजय पागडे, माजी उपाध्यक्ष प्रमोद गोणबरे,सदस्य अनिल पालशेतकर,राजू गुरसळे,कुडलीचे मुकेश थोरसे,यांचे समक्ष कुडली माटलवाडी येथील उर्मिला लक्ष्मण ठोंबरे या महिलेचे हरवले होते त्यामध्ये १०००/- रुपये व चिल्लर होती या पाकीटाची आणि त्या महिलेची खात्री करुन व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समक्ष ते पाकीट जसेच्या तसे शशिकांत पवार यांनी परत केल्याने शशिकांत पवार यांच्यावर व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेकडून तसेच उर्मिला लक्ष्मण ठोंबरे यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून प्रामाणिक पणा अजून हि जिवंत असल्याचे बोलले जात आहे