माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये यावर्षी पासून पुन्हा इयत्ता नववी पासून तंत्रशिक्षण विभाग सुरु होत आहे.
गतवर्षी हा विभाग बंद झाला होता.परंतु पुन्हा हा विभाग सुरु करण्यात संस्थेला यश आले आहे.संस्थेने इयत्ता ९ वी पासून तंत्रशिक्षण विभाग पूर्ववत होण्यासाठी पालक सभा घेतली.या सभेत ५४ विद्यार्थी तंत्रशिक्षण घेण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात आले.या सभेला,याचं शाळेतून तंत्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले व स्वतः च्या उद्योगात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी श्री प्रसाद पाटील, व किरण भायजे उपस्थित होते.त्यांच्या शालेय जीवनात तंत्रशिक्षणाचे संस्कार झाल्याने आपण तंत्रशिक्षणाशी निगडित उद्योगाकडे कसे वळलो व यशस्वी झालो याविषयी त्यांनी आपले विचार मांडले.शिवाय काही पालकांनी आपली मनोगते व्यक्त करत तंत्रशिक्षण चालू करा असा आग्रह केला.
यावेळी संस्था अध्यक्ष डॉ.दत्तात्रय बापट,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव सुभाष सहस्त्रबुद्धे,मनोज शिंदे, संजय सहस्त्रबुद्धे, आदी उपस्थित होते.मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर आदी उपस्थित होते.यावेळी पालकांनी व संस्था संचालकांनी मनोगते व्यक्त केली.
सभेचे सूत्रसंचालन तंत्रशिक्षक संतोष कुलकर्णी यांनी केले.











