तुरळ येथे ७ रोजी ग्रंथश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकिर्तन सोहळा

माखजन |वार्ताहर :   संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित सकल भक्तीपंथीय संघटन हेतू निमित्त ग्रंथश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन तुरळ येथे रविवार ७ एप्रिला करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते वीणा व कलशपूजनाने होईल.९.३० ते १२ या दरम्यान ह.भ.प.श्री.तुकाराम महाराज काजवे हे ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व करतील.दुपारी १२ ते १ च्या दरम्यान महाप्रसाद होईल.३ ते ४ च्या दरम्यान सहविचार सभा होईल.संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान ह.भ.प.गुरुवर्य श्री.रमेश महाराज बांडागळे यांचे प्रवचन होईल.५ ते ६.३० च्या दरम्यान सामुदायिक हरिपाठ होईल.रात्री ७ ते ९ च्या दरम्यान ह.भ.प.महंत गुरुवर्य श्री.अनंत महाराज लिंगायत यांचे हरिकीर्तन होईल.९ ते ११ दरम्यान महाप्रसाद होईल व कार्यक्रमाची सांगता होईल.

तरी संगमेश्वर तालुक्यातील समस्त वारकरी, नामधारक भक्त-भाविकांनी पारायण,प्रवचन,कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज काजवे,उपाध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज बांडागळे,सचिव ह.भ.प.नंदकुमार महाराज लिंगायत,ह.भ.प.सुनिल महाराज करंडे गुरुजी यांच्या वतीने करण्यात येत आहे.