वैभववाडी | प्रतिनिधी : केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय समिती अंतर्गत प्रतिवर्षी विशेषतः ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना विविध शैक्षणिक सुविधा व संधी पुरवण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जानेवारी 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सदर परीक्षामध्ये अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीचा विद्यार्थी शौर्य बोडेकर याची पहिल्या यादीमध्ये निवड झाली आहे. यापूर्वीही त्याने वक्तृत्व स्पर्धा, लांबउडी, उंचउडी व कब्बडी यासारख्या क्रीडास्पर्धांमध्ये तालुकास्तरावर यश संपादन केले आहे.
त्याला मार्गदर्शक म्हणून ऋषिकेश चौगुले, पंढरीनाथ कांबळे, पांडुरंग कोकरे, उदय गोसावी, सारिका सासणे, आरुषी बोडेकर, शितल पाटील, राजेश कळसुळकर, सायली सबनीस व विद्यालयाचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक भास्कर नादकर, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव यांनी त्याचे अभिनंदन केले व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












