समत्व ट्रस्ट ( ठाणे) यांच्या प्रयत्नाने अवनी मतिमंद विद्यालयात कपाटांचे वाटप…..

Distribution of cupboards in Avani Matimand Vidyalaya with the efforts of Samatva Trust (Thane)…..

ठाणे : अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत राहिल्यास आपणास यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे पुन्हा एकदा समत्व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी सिद्ध करून दाखविले.
समत्व ट्रस्ट मागील कित्येक वर्षापासून समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात भरीव असे काम करीत आहे. करोना व चिपळूणमध्ये आलेल्या पुराच्या वेळी तर संस्थेने समाजाप्रती असलेली आपली निष्ठा दाखवून, ज्या जबाबदारीने गरजू व गरीब लोकांपर्यंत मदत पोहोचवली ती कोणी विसरू शकत नाही.
जशी प्रत्येक माणसांची समाजाप्रती जबाबदारी असते, तशी जबाबदारी प्रत्येक कंपनीची असते. अशा कंपन्या आपल्या फायद्यामधून समाजातील तळागाळातील वंचित लोकांना मदत करत असतात.

अशा काही कंपन्यांकडून मदत मिळविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष कांबळे व सर्व विश्वस्त कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत होते. ते संस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. संस्थेच्या मागील कित्येक वर्षाचे कार्य, प्रामाणिकपणा, निःस्वार्थी सेवा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मुंबई, विक्रोळी येथील ब्रर्न अ‍ॅण्ड मॅकडोनल नामक कंपनीने समत्व ट्रस्टच्या माध्यमातून अवनी मतिमंद विद्यालय, मुरबाड जिल्हा ठाणे या शाळेतील मुलांना दोन नवीन लोखंडी कपाटे दिली. त्याचा लोकअर्पण कार्यक्रम शाळेच्या पटांगणात कंपनीचे प्रोसेस टेक्नॉलॉजी मॅनेेजर क्रिस प्लोथेट यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सिन रोझ, इमिली फेरनल, लाउर्न ब्राऊन, अलीसन्स मॅगरा, अनघा दलाल, जनरल मॅनेजर व सी.एस.आर. हेड केतन कुमार मायर, चंद्रशेखर साळवी व जोबीन जॉर्ज हे मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष रूपेश कांबळे व सर्व विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिमा इरक सेट्टी यांनी कंपनी व संस्थेच्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले , मागील 19 वर्षांपासून अविरत मेहनत व प्रयत्न करत अशा मतिमंद विद्यार्थ्यांची सेवा करत आहेत अद्याप त्यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही . त्यांचे कुटुंब वैयक्तिक पातळीवर सर्व सेवा करत आहेत .त्या बद्दल मान्यवरांचे त्याचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.समत्व ट्रस्ट आज कित्येक वर्षापासून अनेक कंपन्यांना संपर्क करून संस्थेचे कार्य तळागाळा पर्यंत नेण्याचे प्रयत्न करत होते परंतु त्यांना सतत अपयशाला समोरे जावे लागत असे.परंतु संस्थेने आपले प्रयत्न थांबवले नाही आणि शेवटी संस्थेच्या प्रयत्नाला यश आहे .त्यासाठी तळागाळातील लोकांन कडून संस्थेचे व सर्व विश्वायचे कौतुक होत आहे.