खेडशी येथून तरुण बेपत्ता

Google search engine
Google search engine

Youth missing from Khedshi

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील खेडशी येथून तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.ही घटना सोमवार 20 मार्च रोजी रात्री 10.30 वा.घडली आहे.प्रणय विजय मेडेकर (28,मुळ रा.आगरनरळ,सध्या रा.खेडशी,रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याचे वडिल विजय सिताराम मेडेकर (55) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार,प्रणय हा गेली 10 ते 12 वर्षांपासून मनोरुग्णासारखर वागत आहे.त्याच्यावर मनोरुग्णालय व चिपळूण येथे उपचार सुरु आहेत.20 मार्च रोजी तो आई व बहिणीसोबत बाहेरगावी देव दर्शनासाठी गेला होता.तेथून ते सर्व नरसोबाची वाडी येथे दर्शनासाठी जाणार होते.परंतू,प्रणयने आई आणि बहिणीला मी नरसोबाची वाडी येथे येणार नसल्याचे सांगितले.

तेव्हा त्याच्या आईने त्याला कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये बसवून पाठवून दिले होते.या दरम्यान घरात कोणीही नसल्याने प्रणयचे वडिल विजय मेडेकर हे आपल्या मुलीकडे रहायला गेले होते.त्यामुळे प्रणय कोल्हापूरहून रत्नागिरीत घरी आला तेव्हा ते घरी नव्हते.21 मार्च रोजीत्र स.5 वा.विजय मेडेकर आपल्या मुलीच्या घरातून आपल्या घरी गेले असता त्यांना प्रणयने कोल्हापूरहून रत्नागिरीत येताना घातलेले कपडे घरात काढून ठेवलेेले दिसून आले.परंतू प्रणय घरात कोठेही दिसून आला नाही.त्यामुळे त्यांनी आजुबाजुला तसेच नातेवाईकांकउे प्रण्यची चौकशी केली परंतू त्याचा कोठेही पत्ता लागलेला नाही.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल भितळे करत आहेत.