डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

मंडणगड l प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी दीप प्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी ज्येष्ठ शिक्षिका सौ.योजना शेट्ये, ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील घोसाळकर यांनी अगरबत्ती प्रचलित करून, बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केली .यानंतर विधी आंबेकर व शिरीष भोसले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री.किशोर कासारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत व जग आज बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करते आहे असे सांगितले. त्यानंतर शिक्षक श्री. सुनील घोसाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आपण महापुरुषांचे गुण घेतले पाहिजे. बाबासाहेबांमधील जिद्द, चिकाटी आपल्या अंगी आली पाहिजे आणि त्यातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण उच्च विद्याविभूषित पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. संजय अवेरे यांनी केले .सौ. योजना शेट्ये यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.