तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे यश

मंडणगड l प्रतिनिधी :     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ, मंडणगड तालुका शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय निबंध व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धा

१) पहिली ते पाचवी प्राथमिक गट

२) सहावी ते आठवी उच्च प्राथमिक गट

३) नववी ते बारावी माध्यमिक गट

अशा तीन गटांमध्ये घेण्यात आल्या .यामध्ये केंद्र स्तर, बीट स्तर व तालुकास्तरावर विद्यार्थ्यांनी आपले निबंध सादर केले. आणि या तिन्ही स्तरावर परीक्षणातून तालुक्यात नंबर काढण्यात आले. यामध्ये मंडणगड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या विद्यार्थिनी

१) कुमारी सिद्धी दिलीप खांबे

ही माध्यमिक गटातून प्रथम आली. त्याचबरोबर उच्च प्राथमिक गटातून कुमारी २)सोनू हंसाराम परिहार हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत ,प्रमाणपत्र व पेन बक्षीस म्हणून देण्यात आले.

या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे व पर्यवेक्षक श्री .अर्जुन हुल्लोळे यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.