रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीत येत आहेत अशी माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत दिली. शहा यांची सभा रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार असल्याचे त्या स्पष्ट केले.











