पंतप्रधान उज्वला योजनेतील एलपीजी गॅस सबसिडीची मुदत एक वर्षाने वाढवली

The term of LPG gas subsidy under Pradhan Mantri Ujwala Yojana has been extended by one year

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ करण्याबरोबर सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबरही दिली आहे. देशात करोडो पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. अशा प्रकारे या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, २०२२ मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी (अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.