आमदार नितेश राणे यांच्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
सलग दहाव्या दिवशी ही भाजपा मधे इनकमिंग सुरू
देवगड येथील साळशी गावातील उबाठा गटाचे कार्यकर्ते मनोहर दिनकर नाईक, महेश्वर नाईक यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, संतोष किंजवडेकर,अमित साटम, संदीप साटम, सरपंच किरण मेस्त्री, सत्यवान,भोगले, मयुरेश मिराशी,आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.











