शिरगाव (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील शिरगाव-रामनगर येथील रामनवमी उत्सवानिमित्ताने, श्री पावणाई बांदेश्वर मंडळाने आयोजित केलेल्या निमंत्रित रंगीत दिंडी भजन स्पर्धेत आई भगवती कला दिंडी तोरसोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
आई भगवती कला दिंडी तोरसोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल रोख ५००१ रुपये बक्षिस व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.तसेच श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक याचा द्वितीय क्रमांक आला.त्यास रोख ४००१ रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी विनायक साटम, मिलिंद साटम, महेश मेस्त्री, वसंत साटम, रघुनाथ साटम, अंकुुश मेस्त्री, मंगेश घाडी तसेेच मंडळाचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेचे परिक्षण भजनप्रेमी विलासराव एनापुरे यांनी केले.
तसेच या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यानी केले.
तसेच यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सौ. दिशा दीपक साटम या पैठणीच्या विजेत्या ठरल्पा.












