गतवर्षी च्या तुलनेत २०% उत्पादन मिळण्याचा बागायतदारांचा अंदाज
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यात काजूच्या उत्पन्नात यावर्षी मोठी घट पाहायला मिळत आहे.एप्रिल चा अखेर आला तरी काजू उत्पन्नाला सुरवात न झाल्याने इथला बागायतदार चिंतेत आहे.बागायतदारांच्या म्हणण्यानुसार गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त २०% उत्पन्न मिळेल अशी शक्यता वर्तवली.जात आहे.काजू व आंबा. बागेवर वर्षभर मेहनत घेऊन,याचं उत्पादनावर अवलंबून असलेल्या बागायतदारांना यावर्षी मोठ्या संकटाला समोरे जावे लागत आहेत.
साधारणता एप्रिल च्या शेवटाकडे काजू सिझन अर्ध्यावर आलेला असतो.परंतु यावर्षी एप्रिल चा शेवट आला तरी. काजू उत्पादन नसल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत.शिवाय आंब्याची झाडें अद्याप मोकळीच दिसत असल्याने त्याही उत्पादनाच्या आशेवर असणारे बागायतदार चिंताग्रस्त दिसत आहेत.











