जागुष्टे हायस्कुल येथे संगीत कार्यशाळा

 

गायिका मुग्धा भट सामंत यांनी केले मार्गदर्शन

माखजन |वार्ताहर रत्नागिरीतील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल कुवारबाव प्रशालेमध्ये रत्नागिरीमधील प्रसिद्ध गायिका सौ मुग्धा भटसामंत यांनी संगीत कार्यशाळा घेतली.

 

या कार्यशाळेचा आनंद इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी घेतला.संगीत शिक्षणाचा उपयोग विद्यार्थी जीवनात एकाग्रता वृद्धीसाठी कसा होऊ शकतो, संगीत आणि अन्य कला यांचे जीवनामध्ये काय स्थान आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात संगीत कलेचे स्थान, ज्ञानाच्या सर्वोत्तम शाखांमध्ये संगीताचे असलेले स्थान, आपल्या देशाच्या संस्कृतीची जोपासना, संगीताशिवाय मनुष्य जीवन निरस, संगीत क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी त्याचबरोबर संगीत आणि गणित यांचा असलेला सहसंबंध अशा बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करणारी ही संगीतकार्य शाळा होती.

 

यावेळी जागुष्टे हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ पूजा कात्रे उपस्थित होत्या तर सूत्रसंचालन सौ अक्षया भाटकर यांनी केले.