खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील गुलमोहर पार्क, गोळीबार मैदान येथील मैदानावर प्रथमच १७ ते १९ मे या कालावधी मध्ये खेड तालुका बुध्दिस्ट प्रीमीयर लीग या खेड तालुका स्तरिय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पहिल्या पर्वाचा शुभारंभ १७ मे रोजी पार पडणार असल्याची माहिती संयोजक महेश मर्चंडे यांनी दिली
या स्पर्धे साठी खेळाडू नोंदणी सुरू करण्यात आली आहे या पर्वातील प्रथम विजेत्या संघास २५ हजार रुपये रोख व चषक, उपविजेत्या संघास २० हजार रोख व चषक, तृतीय विजेत्या संघास १५ हजार रुपये रोख व चषक तर चतुर्थ विजेत्यास १० हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच
उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकाविर – यांना कुलर देण्यात येणार आहे
अधिक माहितीसाठी महेश मर्चडे ९५६१६८५०८८, विशाल तांबे – ७०५७९०८९७९ , सुरज मोहिते ७७७४९९२०६१, सूरज तांबे ८३०८४१०६३८, रोशन धोत्रे ७९७२८२४३११, आदी जवळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे









