रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील दांडेआडोम येथे बेकायदेशिरपणे गावठी दारुची विक्री करणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 8 जुलै रोजी सकाळी 11.30 वा.करण्यात आली आहे.
संतोष कृष्णा मोरे (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शनिवारी सकाळी ग्रामीण पोलिस दांडेआडोम परिसरात गस्त घालत असताना त्यांना जाधववाडीकडे जाणार्या रस्त्यालगर झाडी-झुडपांच्या आडोशाला संशयित संतोष मोरे बिगर परवाना गावठी दारु विक्रीसाठी आपल्या जवळ बाळगून असताना मिळून आला.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.