रेवतळे येथील वाहतूकिस अडथळा ठरणारे व धोकादायक स्थितीतील जीर्ण वीज खांब बदलले : नागरिकांनी व्यक्त केले समाधान
अमित खोत | मालवण: मालवण शहर रेवताळे येथील वाहतूकिस अडथळा ठरणारे व धोकादायक स्थितीतील जीर्ण वीज खांब माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या यांच्या कार्यतत्परते नंतर वीज वितरण विभागाने बदलण्याची कार्यवाही पुर्ण केली आहे.
दरम्यान, रेवतळे मार्गांवर काही ठिकाणी वीज तारा तसेच मार्गांवर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फ़ांद्याही तोडून मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
नागरिकांची मागणी भाजप युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी दीपक पाटकर यांच्याकडे मांडली. त्यानुसार पाटकर यांनी तात्काळ दखल घेत वीज वितरण मालवण वीज वितरण विभागाशी संपर्क साधून वरिष्ठ अधिकारी मेहत्रे, भुजबळ, वीज विभागाचे ठेकेदार तसेच झाडे तोडण्यात सहकार्य करणारे विकी माळगावकर या सर्वांच्या सहकार्यातून मंगळवारी तत्पर पणे कार्यवाही केली.
याबाबत स्थानिक नागरिक राजा देसाई, अरु देसाई, जया मसुरकर, अजित मसुरकर, मेस्त्री, शुभम लुडबे यांनी आभार मानले.












