महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजापुरात

राजीव गांधी क्रिडांगणावर जाहिर प्रचारसभेची जंगी तयारी  

राजापूर (प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजापुरात येत आहेत. शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर होत असलेल्या या जाहिर प्रचार सभेची महायुतीकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता ही सभा सुरू होणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सध्या सुरू आहे. मतदार संघात महायुतीचे नेते व कार्यकर्ते जोमाने प्रचार आहेत. आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे उमेदवार ना. राणे यांच्या प्रचारासाठी राजापुरात येत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी फडणवीस यांची ही जाहिर प्रचार सभा होणार आहे.

याप्रसंगी महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना नेते किरण सामंत, मनसेचे अविनाश सौंदळकर, आरपीआयचे राजन बेतकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत आदींसह महायुतीचे नेते उपस्थित रहाणार आहेत.

दुपारी ना. फडणवीस यांचे राजापूरात आगमन होणार असून ते राजीव गांधी क्रिडांगणावर होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेची जोरदार तयारी महायुतीकडून करण्यात आली आहे. राजीव गांधी क्रिडांगणावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या सभेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन जठार यांनी केले आहे.