रत्नागिरी येथील राज्यस्तरीय मेमोरियल मूट कोर्ट स्पर्धेत सिद्धयोग लॉ कॉलेज खेडचे यश

Google search engine
Google search engine

चिपळूण | वार्ताहर : रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय मुट कोर्ट स्पर्धेत खेडमधील शिवतेज संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम मेमोरियलचे पारितोषिक पटकावले. सिद्धयोग विधी महाविद्यालय विकास समितीला आणि आमच्या टीचिंग आणि नॉन टीचिंग टीमला याचे श्रेय जाते.खेड सिद्धयोग विधी महाविद्यालयात अतिशय उत्तम प्रकारे वकील होण्यासाठी मार्गदर्शन कुशल आणि ज्ञानसंपन्न प्राध्यापक वर्ग यांच्याकडून केले जात आहे. संस्थेची मॅनेजमेंट आणि विधी महामंडळ विद्यालयाच्या प्राचार्य यांच्या माध्यमातून एक आदर्श वकील घडावा यासाठी सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी नेहमीच तत्परतेचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजेच रत्नागिरी येथील भागोजी किर विधि महाविद्यालयात पार पडलेल्या राज्यस्तरीय मुट कोर्ट स्पर्धेत सिद्धीयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम मेमोरियलचे पारितोषिक पटकावत आपल्या कॉलेजचे नाव उंचावले आहे .

हा एक अभिमानाचा क्षण असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांनी व्यक्त दैनिक प्रहार शी बोलताना मत व्यक्त केले आहे. येथे एक उत्तम वकील घडविण्याची एक प्रभावी अशी प्रक्रिया परिणामकारक रित्या सातत्याने राबवली जाते त्यात आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कैक उपक्रम नित्य राबवितो. त्यातील माझे स्वतःचे अगदी आवडते असे आहेत ते मोफत इंग्रजी भाषा कौशल्य विकसन वर्ग, लेखन कौशल्य विकसन वर्ग, वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य विकसन वर्ग, लीगल ड्राफ्टींग प्रशिक्षण, कॉर्पोरेट प्लेसमेंट आणि वकीलांसाठी असलेल्या विविध करिअर साठी प्रशिक्षण शिबिरं तसेच संपूर्ण व्यक्तिमत्व विकसनासाठी शिवचरित्र स्वाध्यायमाला. आम्ही प्रभावी निकालांसाठी साप्ताहिक उजळणी वर्ग ही राबवतो” असे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोन्द्रे यांनी सांगितलं. ज्यांनी रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयात राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत सहभाग घेत मेमोरियल पारितोषिक पटकावले त्या विद्यार्थ्यांना संस्था आणि कॉलेज यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.