रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सदस्या, बाल रंगभूमीच्या रत्नागिरीसाठी काम करणाऱ्या आसावरी शेट्ये यांचे पुण्यात दुःखद निधन झाले आहे.
पुणे येथे आपल्या मैत्रिणीकडे त्या गेल्या होत्या. तिथे त्यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या धडाडीच्या महिला नेत्या होत्या. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या त्या पदाधिकारी होत्या. रत्नागिरीतील प्रसिद्ध श्रीराम मंदिरातील उत्सव, नाट्य क्षेत्र बाल रंगभूमी यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












