जनतेतून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रचारा दरम्यान भाजपा महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर यांनी व्यक्त केला विश्वास
अमित खोत | मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ घरोघर फिरत असताना जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद पाहता राणे साहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजपा महिला पदाधिकारी यांच्या वतीने तालुकाध्यक्ष पूजा करलकर यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मालवण तालुक्यात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रचार केला जात आहे. मालवण शहर बुथ 93 क्षेत्रातही मोठ्या प्रतिसादात प्रचार करण्यात आला.
यावेळी भाजपा शक्ती केंद्रप्रमुख प्रमोद करलकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, दीपक जुवेकर विजया चव्हाण, मिलन मराळ, दीप्ती मराळ, सायली मराळ, सुप्रिया यादव, विशाखा यादव,जागृती वीर, दिव्या वीर, गायत्री मराळ, प्रणिता माराळ, विजया परब, दर्शना करलकर, विशाखा पाटकर, ज्योती जुवेकर, संगीता पाटकर, धनश्री मराळ, मनाली आचरेकर, प्रणाली आचरेकर, वृषाली कदम, रंजना वीर, गंधाली मराळ, आरती मराळ, रुपाली आचरेकर यांसह अन्य पदाधिकारी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












