खेड(प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गा वरील भरणे येथील साई शंकर अपार्टमेंटच्या समोर टेम्पो ने दिलेल्या धडकेत ५७ वर्षीय प्रौढ ठार झाल्याची घटना २ मे रोजी रात्री १०.३० घडली या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रमेश बेंडु चिले वय ५७ रा. क्षेत्रपालनगर २ नं. शाळेच्या पाठीमागे, खेड असे ठार झालेल्या प्रौढा चे नाव आहे तर प्रशांत प्रकाश कोकजे वय- ४२ वर्षे, रा. कोकजे वठारनिवळी ता.जि. रत्नागिरी.असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे या प्रकरणी श्रीधर सुभाष गावडे भडगांव मधलीवाडी यांनी तक्रार दाखल केली
यातील मयत रमेश बेंडु चिले हे रस्ता क्रॉस करीत असताना आयशर टेम्पो नं. एम.एच.०८- ए.पी.-३८६४ वरील चालक प्रशांत प्रकाश कोकजे याने त्याचे ताव्यातील आयशर टेम्पो ने मयत रमेश बेंडु चिले यांना समोरुन धडकून अपघात केला. त्यामुळे रमेश बेंडु चिले हे रस्त्यावर पडुन त्यांचे डोक्यास गंभीर दुखापत झाली असुन त्यांचे डाव्या हाताचे कोपयावर तसेच हातास दुखापत होपुन डोक्यातुन अति रक्तस्त्राव होऊन ते जागीच मयत झाले











