शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
सहकुटुंब मतदान केंद्रावर जात केले मतदान
महायुतीच्या विजयाचा केला विश्वास व्यक्त
सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी शहरातील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. ना. दीपक केसरकर यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांच्यासह मुलगी यांनी देखील मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मोठा उत्साह असून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत असून मतदान करत आहेत. विकसित भारतासाठी मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करीत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.












