खेड(प्रतिनिधी) खेड शहरासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अल्प मतदान झाले असल्याने मतदारांत कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे. रायगड लोकसभेत येणाऱ्या गुहागर व दापोली विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते सांय ५ वाजेपर्यंत ५३.७७ टक्के मतदान झाल्याने मतदानाचा टक्का चांगलाच घसरला आहे. संध्याकाळी ६ वाजता आलेल्या आकडेवारी नुसार अंदाजे ६० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले
मतदाना च्या दिवशी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या गावातील जामगे गावात प्रथमच विरोधी पक्षाचा बूथ लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे रामदास कदम यांचे छोटे बंधू सदानंद कदम यांनी हा बूथ लावला होता . त्यामुळे तालुकावासियांसह संपूर्ण प्रशासनाचे जामगे गावी लक्ष लागले होते मात्र . कोठेही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी प्रशासन दक्षतेने काम करीत होते . सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण झालेले मतदान ५३.७७ टक्के इतके झाले होते सांयकाळी ६ पर्यत अंतिम सत्रात मतदाना ची टक्केवारी मध्ये काही टक्के वाढ झाली
दुपारच्या सत्रात उन्हाच्या तडाख्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यास टाळाटाळ केलेली दिसून आली जवळपास बरीचशी मतदान केंद्र मतदाराव्यतिरीक्त ओस पडलेली दिसून आली.मात्र ६ वाजे पर्यत मतदाना ची टक्केवारी ६० वर जाऊन स्थिरावली असल्याचे सांगण्यात आले
दरम्यान मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.












