मुलीवर अत्याचार, संशयिताची निर्दोष मुक्तता

 

खेड(प्रतिनिधी) एका मुलीचा पाठलाग करून त्रास देत लग्नासाठी वारंवार विचारणा करत लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका असलेल्या संदेश पाष्टे या संशयिताची न्यायालयाने एक महिन्यातच निर्दोष मुक्तता केली.

 

पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्यास अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा जलदगतीने खटला चालवण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. संशयिताच्यावतीने अॅड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी केलेला युक्तीवाद
ग्राह्य धरत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.