राजापूर (वार्ताहर): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अजित यशवंतराव यांची कोकण विभागीय पदवीधर मतदार संघासाठी पक्षाचे वतीने समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडून श्री. यशवंतराव यांना प्राप्त झाले आहे.
या निवडणुकीत आपण या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, तसेच महायुतीतील मित्रपक्ष, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख यांच्याशी संपर्क साधून महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा व निवडणूक जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याच्या दृष्टीने समन्वय करावा असे सूचीत करण्यात आले आहे.
श्री. यशवंतराव यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
————————————————————









