रत्नागिरी: भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. वैभव घाणेकर यांनी केले.
या वर्षासाठी विज्ञान दिनाची थीम ‘विकसित देशासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ ही होती. या थीमला अनुसरून विज्ञान विभागातर्फे विविध विषयांवर विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान शाखेतील सर्व विषयांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून प्रात्यक्षिकांद्वारे यावर्षीचा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. तसेच या विषयाला अनुसरून डॉक्युमेंटरी फिल्मही दाखवण्यात आली. विज्ञान प्रदर्शनाला महाविद्यालयातील तर शाखेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी भेट दिली.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, विज्ञान विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, विज्ञान शाखेचे प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच इतर शाखांचे विद्यार्थी इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश रणसे याने केले तर लीना गंगठडे हिने आभार मानले.











