चिपळूणमध्ये तुफान अवकाळी पाऊस 

 

 

 

 

चिपळूण (प्रतिनिधी) :-गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने थोडाफार दिलासा मिळत असला तरी जनजीवन विस्कळीत होत आहे. गुरुवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळासह जोरदार अवकाळी पाऊस पडला.

 

 

 

चिपळूण शहरा सह ग्रामीण भागात जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. तब्बल २ तास कोसळलेल्या पावसाने अक्षरशः कहरच केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जन जीवन काही अंशतः विस्कळित झाले सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले

 

गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास काळोख दाटून येत काही क्षणात वादळी वारे व विजेच्या कडकडाटा सह पावसाने जोरदार हजेरी लावली या पडलेल्या पावसाने वातावरण मध्ये गारवा तयार होऊन उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्याना दिलासा मिळाला मात्र अनेकाची त्रेधातिरपीट उडाली ग्रामीण भागाला देखील मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले

 

दरम्यान वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता सायंकाळी उशिरा पर्यत पावसाचा जोर मात्र कायम राहिला होता