लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

 

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक – २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण – २२.५२ टक्के

ठाणे – २६.०५ टक्के

मुंबई उत्तर – २६.७८ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के