मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे [भरतगड] उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.५९% लागला आहे. तीन ट्रेड मधून प्रविष्ठ २७ विध्यार्थ्यां पैकी २५ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक सागर अमोल धावडे(८०.००%), व्दितीय क्रमांक केदार कमलाकर तांडेल.(७८.००%),
तृतीय क्रमांक हर्षद दत्ताराम सांडव(७६.५०%) यांनी यश प्राप्त केले. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी अभिनंदन केले आहे.












