वीज सेवेबाबत महावितरणने तत्पर राहावे

भाजप युवा मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष अभि लाड यांनी वेधले लक्ष

मालवण | प्रतिनिधी : पाऊस अजून सूरूही झाला नाही तोवर वीज वितरणचा खेळखंडोबा दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सूरू झाला आहे. महावितरणने सतर्क राहून वेळीच उपाययोजना कराव्यात. तासंतास खंडित होणारा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत व्हावा यासाठी तत्पर प्रयत्नाशील राहावे.

दिवसभर वीज खंडित होणे, वीज कार्यालयातील फोन बंद राहणे. यामुळे नागरिक अधिक त्रस्त होतात. कोणत्याही आपत्तीत पडझडं यात वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. मात्र लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी सतर्क राहावे. जीर्ण झालेले वीज खांब बदलणे, वीज तारावरील झाडाच्या फ़ांद्या तोडून वीज मार्ग मधील अडथळे दूर ठेवावेत. महावितरणने योग्य ती खबरदारीं घेऊन उरलेली कामे लवकर आटोपून वीज पुरवठा सुरळीत ठेवाव. वीज अधिकारी यांनी सेवेबाबत तत्पर राहावे.

भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य वीज वितरणला केले जाईल. अशी माहिती युवा मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष अभि लाड दिली आहे.