माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन चा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला आहे.तर अॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने देखील १२ वी च्या निकालात उज्वल परंपरा कायम राखली आहे.
माखजन इंग्लिश स्कूल मधून १० वी साठी १०७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये वेदिका दत्ताराम मोरे हिने ९४.८०% मिळवत प्रथम,नेहा नेताजी चव्हाण ९४.६०% द्वितीय,तर कोमल मांगीलाल पटेल ९३.८०% मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
अॅड पी आर् नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखे चा निकाल ९८.३६% लागला.यामध्ये ६१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये ओंकार रवींद्र खसासे ६५.१७% प्रथम,शेख अमीना खातून मो.अब्दुल्लाह ६३.६७% द्वितीय ,सिद्धी संतोष बोले ६०.१७ तृतीय क्रमांक मिळवला.तर कला शाखेचा निकाल ९३.९३% लागला.कलेला ३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यामध्ये, दिव्या मंगेश घेवडे६८.५०% प्रथम,सानिका सीताराम भुवड ६०.६७% द्वितीय,श्रद्धा नंदकुमार जाबरे ५४.८३% तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला होता.या शाखेतून ६५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये समीक्षा रघुनाथ खाससे ८७.८३%प्रथम,आयुष रमाकांत गोरे ८४.३३% द्वितीय,शुभम सुरेश पड्यार ८२.१७% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाअध्यक्ष,संस्था संचालक,मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग यांच्या कडून अभिनंदन् होत आहे.











