7 जूनपासून कोकणात अनेक ठिकाणी मुसळ धार
मुंबई : कोकणवासीयांसाठी मोठी खुशखबर आहे. येत्या चार ते पाच दिवसात गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय वेधशाळेने व्यक्त केली आहे. 7 जून पासून कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनने सोमवारी तीन जूनला कर्नाटक रायलसीमा ,आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणाचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनची ठरल्याप्रमाणे आगेकुछ सुरू झाली असून चार ते पाच दिवसात मान्सूनचे गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात आगमन होणार आहे. 7 जून पासून कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आता कधी एकदा मान्सूनचा आगमन होते आणि जोरदार पावसाच्या सरी कोसळतात याकडे कोकणवासियांचं लक्ष लागून असतानाच भारतीय वेधशाळेन कोकण वासियांसाठीही मोठी आनंदाची बातमी दिली आहे.











