मालवण | प्रतिनिधी : मालवण जवळील मोरयाचा धोंडा या ठिकाणी समुद्रात बुडत असलेल्या
दिपक विजय मबुकर [सोलापुर] वय २९, या पर्यटकाला वाचवाणाऱ्या मालवण येथील रेस्क्यू टीमच्या सदस्यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मालवण येथे काही दिवसांपूर्वी पर्यटन सफरिवर आलेल्या सोलापूर येथील काही पर्यटक मोरया धोंडा या ठिकाणी समुद्रात स्नान करण्यासाठी उतरले होते. यामध्ये दीपक मबुकर हा युवक सुद्धा समुद्रस्नान करत होता याच वेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दीपक समुद्रात बुडू लागला. या घटनेची माहिती समजताच मालवणीतील रेस्क्यू टीमचे सदस्य सुजित मोंडकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ धावून आले. त्यांनी समुद्रात बुडालेल्या दीपक याला आपल्या जिवाजी पर्वा न करता समुद्रातून बाहेर काढत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार झाले. रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे दीपक याचे प्राण वाचू शकले.
याबाबत माहिती मिळताच मालवण पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते रेस्क्यू टीमचे सदस्य सुचित मोंडकर, संमेश परब, अक्षय मेथर, प्रतीक चांदेरकर, सचिन आडकर भावेश तोडणकर छगन सावजी, वरद तोडणकर भावेश ढोके, पारस मालंडकर यांचा सत्कार करण्यात आला.











