खेड(प्रतिनिधी) तळे विभाग सेकंडरी स्कूल,तळे विद्यालयामध्ये राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभाग खेड व दापोलीचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित राहून वृक्षारोपण करण्यात आले,तसेच पर्यावरणीय उपक्रमांची व वृक्षारोपनाचे महत्त्व समजावून सांगून जनजागृती केली.
याप्रसंगी श्रीमती जयश्री फुंदे ,हृषीकेश शिंदे,वनरक्षक सामाजिक वनीकरण खेड,श्री आत्माराम माने वनरक्षक सामाजिक वनीकरण दापोली,श्री राजेंद्र राऊत वनमजुर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पोपटराव जगताप ,राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री प्रशांत पंदेरे ,शिक्षकेत्तर कर्मचारी,राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते










