घटनेने दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार- आ. योगेश कदम

दापोली | प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेत लोकशाहीला अनन्यसाधारण महत्व असून घटनेने बहाल केलेल्या अधिकाराचा आमदार म्हणून योग्य वापर करून संपूर्ण दापोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधारण असल्याचे मत आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.वणौशी तर्फे नातू येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. वणौशी तर्फे नातू या गावाच्या विकासाकरता सुमारे 74 लाख 34 हजार इतका निधी मंजूर झाला असून, खोतवाडी रस्ता डांबरीकरण करणे 4 लाख, काळकाई देवी मंदिर संरक्षण भिंत बांधणे 8 लाख आदी कामे आ. योगेश कदम यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. या गावाने आजपर्यंत जे-जे मागितले ते आम. योगेश कदम यांनी दिले असल्याने आमदार आणि गाव हे एक वेगळ समीकरण झाले आहे.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ. योगेश कदम म्हणाले की, जलजीवन मिशन हर घर नल या योजनेचा आराखडा तयार होत असताना कोणतेही गाव या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः जातीनिशी लक्ष घालून कोणताही पक्षपात न करता दापोली मतदार संघातील सर्व गावे समाविष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचा 60 टक्के निधी, महाराष्ट्र सरकार 40 टक्के निधी व ग्रामपंचायत लोकवर्गणी 10 टक्के अशा स्वरूपात ही नळपाणी योजना राबवली जात आहे. ही योजना गावोगावी होत असताना आपण ग्रामस्थ म्हणून या योजनेचे काम ठेकेदाराकडून जबाबदारीने करून घ्यायचे आहे. कारण पुढील किमान 25 वर्षात पुन्हा अशी मोठी योजना पाण्यासाठी राबवली जाण्याची शक्यता कमी आहे, मात्र ती विकास कामे ही आपण अधिकाऱ्यांना ठेकेदारांना विश्वासात घेऊन योग्य पध्दतीने आपल्या गावचा विकास साधण्याचे आवाहनही त्यानीं यावेळी केले. भारत पाकिस्तान युध्दात वीरमरण आलेले शहीद विठोबा चव्हाण यांच्या स्मारकाची दुरूस्ती व्हावी म्हणून यावेळी ग्रामस्थांनी आ. योगेश कदम यांच्याकडे मागणी केली असता, आपण मला ग्रामपंचायतचा प्रस्ताव द्या या स्मारकासाठी त्वरित निधी मंजूर करून देतो असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख उन्मेष राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे, युवासेना सचिव अमित पारदुले, सरपंच प्रकाश चिंचघरकर, कासम महालदार, शाखाप्रमुख विजय पाटणे, मारूती पाटणे, नामदेव पाटणे, चंद्रकांत पाटणे, नितीन पाटणे, किशोर पाटणे, कृष्णा पाटणे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा पाटणे, सौ. उमा जंगम, सतीश चव्हाण, संतोष दळवी, कौस्तुभ जोशी, सातेरे सरपंच राजेंद्र पेडणेकर आदी बहुसंख्य ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.