लोकमान्य वाचनालयास श्रीमती विजया जोशी यांचे कडून दोन लाख रुपये देणगी

 

लांजा (प्रतिनिधी ) लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेस पुणे येथील श्रीमती विजया जोशी यांचेकडून दोन लाख रुपयांची देणगी देण्यात आली

 

सदराचा कार्यक्रम लोकमान्य वाचनालय येथे पार पडला.कै.सरस्वतीबाई विनायक देशमुख यांच्या स्मरणार्थ ही देणगी देण्यात आली. या बद्दल श्रीमती विजया जोशी यांचे लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेचे संचालक मंडळाचे वतीने अभिनंदन करण्यात आले. या उत्स्फूर्त देणगी दिल्याबद्दल संस्थेचे वतीने आभार मानन्यात आले.
या वेळी लोकमान्य वाचनालय, लांजाचे अध्यक्ष अँड. अभिजीत जेधे ,योगेश वाघधरे, जयवंत शेटये, सदानंद देशमुख, राहुल मराठे, महेश सप्रे, अँड निरंजन देशमुख, विनोद बेनकर यादी मान्यवर उपस्थित होते