सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी वैश्यवाडा येथील रहिवासी सौ. नीता अरुण म्हापसेकर यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती अरुण म्हापसेकर, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे, दिर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संजय म्हापसेकर तसेच नगर परिषद कर्मचारी दीपक म्हापसेकर यांच्या त्या वहिनी होत. सोमवार १० एप्रिल रोजी सकाळी ७ वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.