एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
कणकवली : शासनमान्य असलेल्या कोकणलती पहिल्या इनक्युबेशन सेंटरचे काही वेळात उदघाटन होणार आहे.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कोकण भूमी टीबीआय फाउंडेशन या कोकणातील पहिल्या इंक्युबेशन सेंटर चे उदघाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे. यावेळी संस्थाध्यक्ष नीलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे,आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.