अनुस्कुरा घाट update : दरड हटवण्याचे काम सुरू… वाहतूक पर्यायी मार्गाने…

राजापुरात अनुस्कुरा घाटात कोसळलेली दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांच्यावतीने तत्काळ दर हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून या मार्गावरील सर्व वाहतूक आंबाघाट मार्गे वळवण्यात आले आहेत