गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील देवघर येथील एका बँक कर्मचाऱ्याला
बिटकाँइन व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एकूण ६६ हजार ३१७ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात फसवणुकीच्या अशा सातत्याने घटना पुढे येत असताना अजूनही लोक या आमिषाला का बळी पडत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
गुहागर तालुक्यातील देवघर येथील सेवानिवृत्त कर्मचारी शाम शंकर पेवेकर यांनी याबातची फिर्याद दिली आहे. संगणकीय साधनांचा वापर करुन इंटरनेट जनरेटेड क्रमांकाव्दारे वारंवार संपर्क करुन पेवेकर यांना बिटकाँइन व क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणुकीतून ही फसवणूक झाली आहे. सध्या गुहागर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










