अनेक तज्ञांचे मिळणार मार्गदर्शन
न.प.चे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली माहिती
चिपळूण ( वार्ताहर) : नगरपरिषद चिपळूण, जिल्हा प्रशासन ,आणि सहयोगी संस्था यांच्या माध्यमातून चला जाणू या नदीला या अभियाना अंतर्गत डी बी जे महाविद्यालय चिपळूण येथे
दिनांक 21 ते 23 जून या कालावधीमध्ये
नदी की पाठशाला कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चला जाणूया नदीला हे अभियान राज्यभर सुरू आहे. या अंतर्गत नदी की पाठशाला यांच्या माध्यमातून नागरिक, यांच्यापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी नदीची माहिती जाणून घेणे, ज्यांना नदी आणि पर्यावरणाबद्दल प्रेम आहे आणि त्या समस्यांना तोंड देण्यासाठी योगदान देण्याची मानसिकता आहे असा कोणी ही नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतो. यासाठी गूगल फॉर्म भरावा लागणार आहे. सहभागी होण्यासाठी सोबतच्या गुगल फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून तो फॉर्म सबमिट करावा.
दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता डी बी जे महाविद्यालय चिपळूण येथे उपस्थित रहावे लागेल.
नदीच्या पाठशाला यासाठी कोकणातील विशेषता रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी युवक युवती त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. फक्त मर्यादित 60 जागा असल्याने लवकर गुगल फॉर्म भरावा.
नदी की पाठशाला या उपक्रमात अनेक तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये खास डॉक्टर राजेंद्र सिंग यांचा समावेश आहे. डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, शैलजा देशपांडे, श्री कर्नल सुपनेकर, डॉ. अजित गोखले, श्री. पटवर्धन, अरविंद म्हात्रे, उदय गायकवाड कोल्हापूर, डॉ सुमन पांडे, मल्हार पाटेकर , रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तीन दिवस निवासी उपक्रम असणार आहे.
नदी की पाठशाला संपल्यानंतर त्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये, उन्नत भारत आणि उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत काही अभ्यास प्रकल्प घेता येतील.
ज्याचा उपयोग त्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक उपलब्धतेमध्ये निश्चित होऊ शकेल. अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.अधिक माहिती साठी नगर पालिका आणि शाहनवाज शाह यांची संपर्क साधावा.












