चिपळूण (वार्ताहर) : श्री संत गोरा कुंभार विकास मंडळ व चिपळूण तालुका कुंभार समाज बांधव यांच्या माध्यमातून श्रमदान व आर्थिक मदतीतून उभारलेल्या वास्तूचा उद्घाटन सोहळा रविवार 16 जून रोजी सकाळी ११ वाजता मुलींचे वस्तीगृह खेर्डी दत्तमंदिरच्या बाजूला या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम यांची उपस्थिती लाभणार आहे.
श्री संत गोरा कुंभार विकास मंडळाच्या माध्यमातून अतिशय कमी कालावधीमध्ये या ठिकाणी ही नवीन वास्तूची उभारणी करण्यात आली आहे. याच वास्तूचा उद्घाटन सोहळा रविवार 16 रोजी होणार आहे. यावेळी सकाळी ७.३० ते ८.३० वाजता संत शिरोमणी गोरोबाकाका मूर्ती मिरवणूक, सकाळी ८.३० ते ९ वाजता वास्तु प्रवेश, सकाळी ९ ते १० वाजता गणेश पूजन व गोरोबाकाका मूर्ती स्थापना, सकाळी ११ ते ११.३० वाजता वास्तूचा उद्घाटन सोहळा, ११.३० ते दुपारी २ वाजता मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, दुपारी २ ते ३ वाजता महाप्रसाद आणि संध्याकाळी हरिपाठ व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूण कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण धोंडू कुंभार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम वाशिष्टी मिल्क प्रॉडक्टचे मालक प्रशांत यादव, खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते जयंद्रथ खताते, खेर्डी सरपंच सौ अश्विनी पंडित, पंचायत समिती चिपळूण माजी सदस्य नितीन ठसाळे, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य विनोद भुरण, कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महेश सायकर आणि कुंभार समाजातील महाराष्ट्र व कोकण विभगातून अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन चिपळूण तालुका कुंभार समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.











