वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यात बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू 

 

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्याखाली बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी १६ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश दत्ताराम तळेकर (वय २६ राहणार कळसवली तळेकर वाडी तालुका राजापूर)

आज रविवारी १६ फेब्रुवारी मुंबईतून सकाळी लांजा येथे आला आणि लांजतील मित्रांसोबत दुपारी २.३० वाजता लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धरणातून सोडलेल्या धबधबा व पाण्यात पोहण्यासाठी गेले होते हे सर्वजण पाण्यात पोहत असताना प्रथमेश तळेकर हा धरणाच्या सोडलेल्या पाण्याचे धबधब्याखाली गेला असता तो त्या ठिकाणी बुडाला. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

लांजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडूनच प्रथमेश याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाअंती स्पष्ट झाले आहे याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.फौ.भालचंद्र रेवणे हे अधिक तपास करत आहेत.